‘वक्‍फ’ला दिलेला निधी रहित न केल्‍यास महाराष्‍ट्रभर आंदोलन ! – सुधीर बहिरवाडे, अखिल भारत हिंदू महासभा

जिल्‍हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्‍यानंतर कार्यालय परिसरात उपस्‍थित असलेले अखिल भारत हिंदु महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सोलापूर – ‘वक्‍फ बोर्ड’ हे केवळ मुसलमानांसाठी स्‍थापन केलेले बोर्ड असून आज देशातील ३ र्‍या क्रमांकाची भूमी ‘वक्‍फ बोर्डा’च्‍या कह्यात आहे. शहरात सोलापूर पेठ या भागात ‘वक्‍फ बोर्डा’ने ताबा घेतल्‍यामुळे कितीतरी हिंदूंचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त झाले आहे. ‘वक्‍फ’ने आज अनेक हिंदु मंदिरांच्‍या जागांवर अवैधपणे कब्‍जा घेतलेला आढळतो. त्‍यामुळे ‘वक्‍फ बोर्डा’ला दिलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित न केल्‍यास महाराष्‍ट्रभर आंदोलन करण्‍यात येईल, अशी चेतावणी अखिल भारत हिंदु महासभेचे शहराध्‍यक्ष श्री. सुधीर बहिरवाडे यांनी दिला आहे. या मागणीसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन झाल्‍यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

या प्रसंगी सर्वश्री शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, विशाल जाधव, राहुल येलमोटे, शुभम कराळे, प्रशांत पवार, अर्जुन मोहिते, आेंकार चव्‍हाण, विशाल पवार यांसह अन्‍य उपस्‍थित होते.