बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचारांचे प्रकरण
नवी देहली : हिंदु महासभा ६ ऑक्टोबर या दिवशी मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेरमध्ये होणार्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या वेळी बंद पाळणार आहे. ‘या दिवशी नागरिकांनी त्यांची दुकाने उघडू नयेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ग्वाल्हेरमध्ये हा सामना होऊ देणार नाही. यासंदर्भात आमच्या बैठकीत एकमताने निर्णय झाला असून या दिवशी आम्ही ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे’, असे हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी म्हटले आहे.
ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदे स्टेडियमवर येत्या ६ ऑक्टोबरला भारत-बांगलादेश यांच्यात टी-२० किक्रेट सामना होणार आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा विरोध करण्यासाठी हिंदु महासभेने हा निर्णय घेतला आहे.
The cricket match between India and Bangladesh in Gwalior will not be allowed! – A Warning from the Hindu Mahasabha
Regarding the Atrocities faced by the Hindus in Bangladesh
Very few Pro-Hindu organizations are active in taking steps to stop the cricket match series with… pic.twitter.com/d3WaH0DDMw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 25, 2024
१. यापूर्वी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटन यांनी या सामन्यांना विरोध केला होता. चेन्नई येथील चिदंबरम् स्टेडियमवरील सामन्याच्या वेळी हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष) या संघटनेकडून स्टेडियमबाहेर आंदोलनही करण्यात आले होते. (आंदोलन करण्यात आल्यानंतरही हा सामना खेळला गेला. याचाच अर्थ हिंदूंच्या आंदोलनाला कुणीही महत्त्व देत नाही, हे पहाता हिंदूंनी त्यांची शक्ती वाढवली पाहिजे, हे लक्षात येते ! – संपादक)
२. हिंदु महासभेच्या चेतावणीनंतर पोलिसांनी सांगितले की, सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था चोख केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदु महासभा ही पुष्कळ मोठी संघटना नाही, जी थेट कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देईल. (हिंदूंच्या संघटनांना विषय कितीही गंभीर असला, तरी संघटनेच्या क्षमतेवरून त्याचे मूल्यमापन करून विषयाला गांभीर्याने घ्यायचे कि नाही, हे ठरवले जाते ! याचा विचार हिंदू आणि त्यांच्या संघटना करतील का ? – संपादक)
|
३. मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्यांनी सांगितले की, हिंदु महासभेची चेतावणी इतकी गंभीर नाही. गेल्या महिन्यातही त्यांनी अशाच प्रकारे धमकी दिली होती; (हिंदूंच्या जागी एखादी लहान इस्लामी संघटना जरी असती, तरी प्रत्येकानेच त्याची नोंद घेऊन या विषयावर विचार केला असता ! – संपादक) मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहोत. सामन्याच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा आमचा प्रयत्न आहे.
संपादकीय भूमिका
|