‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर

सातारा, २४ मे (वार्ता.) – अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारत हिंदु महासभेचे प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस यांनी दिली.

शहरातील राजवाडा परिसरात असणार्‍या महिला मंडळाच्या सभागृहात सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक तथा जेष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे, अध्यक्षपदी हिंदु महासभेचे ज्येष्ठ नेते, पत्रकार आनंद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारत हिंदु महासभेचे समन्वयक कार्यवाह संजय कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. या वेळी सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय, कला, उद्योग, सहकार, विधी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून समस्त हिंदूंनी आपले धर्मकर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.