
कोल्हापूर, ४ सप्टेंबर (वार्ता.) – इचलकरंजी येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ प.पू. संतोष कोळी तथा बाळ महाराज यांना पाकिस्तानमधून ‘सर तन से जुदा कर देंगे’, अशी धमकी देण्यात आली आहे. तरी या प्रकरणी प्रशासनाने सखोल अन्वेषण करून संबंधितांवर गुन्हा नोंद करावा आणि प्रशासनाने महाराजांना संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदु महासभा यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले.
या प्रसंगी अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती शीला माने, श्री. राजेंद्र तोरस्कर, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. विश्वास पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ? |
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री