(म्हणे) ‘संधी मिळताच अणूबॉम्ब टाकून भारताला नष्ट करू !’ – पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

जावेद मियांदाद हे जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याचे व्याही आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा जिहादी आणि धर्मांध मनोवृत्तीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाकच्या क्रिकेट संघाशी भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटचे सामने खेळले होते, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ?

आता शालेय अभ्यासक्रमात शिकवला जाणार सायबर सुरक्षा विषय – महाराष्ट्र सायबर सेल

‘जबाबदार नेटीझन्स’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार एका वर्षापेक्षाही अल्प वयोगटातील मुले सर्रासपणे भ्रमणभाषचा उपयोग करतात.

फारूख अब्दुल्ला यांची ‘ईडी’कडून चौकशी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात येत आहे.

पराजयाचा जल्लोष रोखा !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला. खरेतर भारतासाठी ही खेदाची किंवा दुःखद घटना असायला हवी; परंतु ‘या पराभवाचा जल्लोष केला जात आहे’, हे समजल्यावर राष्ट्रनिष्ठ नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

भारतीय संघाच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये धर्मांधांचा जल्लोष !

‘मोठ्या प्रमाणात आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरची स्थिती सुधारली आहे’, असे कोणी म्हणत असेल, तर ते किती फोल आहे, हे या घटनेतून सिद्ध होते ! जोपर्यंत काश्मीरमध्ये अशा देशद्रोही मनोवृत्तीचे लोक असतील, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद आणि देशद्रोही कारवाया थांबणार नाहीत !

तमिळनाडूत स्थापन केलेल्या ‘क्रिकेट गणेश मंदिरा’त गणेशमूर्तींना खेळाडूंच्या रूपात दाखवले !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे देवतांचे मानवीकरण करणारे हिंदू ! सध्या ब्रिटनमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा चालू आहे. स्वतःला गणेशभक्त समजणारे मूर्तीकार के.आर्. रामकृष्णन् यांनी या निमित्ताने रामकृष्णन् यांनी ‘क्रिकेट गणेश मंदिर’ उभारले आहे.

भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या वेळी काश्मीरला स्वतंत्र करण्याची मागणी करणारे फलक झळकले !

ब्रिटनमधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा : मैदानावरून जाणार्‍या विमानांनी अशी मागणी करणारे फलक आकाशात झळकवले ! ‘काश्मिरी नागरिकांवर भारत सरकार अत्याचार करत आहे’, असे चित्र पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगवू पहात आहे. त्यासाठी तो वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहे. अशा पाकला कायमची अद्दल घडवणे आवश्यक !

(म्हणे) ‘भगव्या ‘जर्सी’मुळे (पोषाखामुळे) भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडकडून पराभव !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा थयथयाट

भारताच्या पराभवाचे नाही, तर भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे, याचेच मेहबूबा मुफ्ती यांना अधिक दुःख झाल्याने त्या ते अशा प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

(म्हणे) ‘भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या पोषाखामुळे (जर्सीमुळे) भगवेकरण होते !’ – अबू आझमी

भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या पोषाखाला (जर्सीला) समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विरोध केला आहे. या पोषाखामुळे भगवेकरण होत असल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF