भारतात हिंदु राष्ट्र घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा ! 

हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांची मागणी !

श्री. मुन्ना कुमार शर्मा

पुणे – भारत हे हिंदु राष्ट्र होते, आहे आणि भविष्यातही असेल. येथे १०० टक्के लोकसंख्या हिंदूंचीच होती, विदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले आणि आता हिंदूंची संख्या ७९ टक्के झाली आहे. अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. यासह देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, गोहत्या बंदी कायदा करावा, मंदिरांच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी ‘टेंपल ॲक्ट’ संपुष्टात आणावा, ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करावा, हिंदु साधू-संतांचे रक्षण व्हावे आणि हिंदु मंदिरांचे पावित्र्य अन् विकास यांवर लक्ष केंद्रित करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

या मागण्या मान्य न झाल्यास देशभर जनआंदोलन करण्याची चेतावणीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेला हिंदु महासभेचे महामंत्री श्री. सुनील कुमार, राष्ट्रीय कार्यालय मंत्री श्री. वीरेश त्यागी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.