गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

‘जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला ‘प्रतिपदा’ म्हटले आहे. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्‍वरप्राप्तीसाठी घालवण्यासाठी अन् समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.

गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची सामूहिक प्रतिज्ञा आणि प्रार्थना

गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा आणि प्रार्थना करावी.

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराची तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ?

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो.

गुढीपाडव्याची प्राचीनता सांगणार्‍या काही कथा

नारद मुनींना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्या-पताका उभारून आनंदोत्सव साजरा केला.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

सनातनचा लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या’