प्रेमळ आणि संतांप्रती भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची सांगली येथील कु. स्तुवी नावंधर (वय ११ वर्षे) !
आमच्या वसाहतीत गणपतीचे मंदिर आहे. स्तुवी शाळेत जाण्याआधी सकाळी ७ वाजता गणपतीच्या मंदिरात जाते. ती शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाते. तिला मंदिरात फळे आणि नैवेद्य देण्यात फार आनंद होतो.