बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) येथे जिवंत नागाची पूजा करतांना, तसेच स्पर्धा भरवतांना आढळल्यास तात्काळ गुन्हे प्रविष्ट होणार ! – अपर जिल्हाधिकारी

बकरी ईदला बकरी कापण्याला विरोध न करता जिवंत नागाची पूजा करण्यावर मात्र आक्षेप घेतला जातो ! हिंदूबहुल देशात नेहमीच कायद्याचा बडगा हिंदूंना का दाखवला जातो ? ईदच्या वेळी सहस्रोंच्या संख्येने मुसलमान मुंबईच्या रस्त्यावर एकत्र आल्यावर त्याविषयी काही गुन्हे नोंद झाल्याचे ऐकिवात नाही. वर्षातून एकदा येणार्‍या नागपंचमीला पूजा करण्याला जमावबंदी प्रस्ताव लागू करण्याचा विचार केला जातो, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच नव्हे का ?

सांगली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपंचमीच्या दिवशी अंबामाता मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बत्तीस शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करतांना, तसेच स्पर्धा भरवतांना आढळल्यास तात्काळ गुन्हे प्रविष्ट करावेत, त्याचसमवेत न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले. बत्तीस शिराळा येथील नागपंचमी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अपर जिल्हाधिकारी कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

अपर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘शिराळा आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी कलम १४४ लागू करण्याविषयी उपविभागीय अधिकारी वाळवा आणि तहसीलदार शिराळा यांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा. वनविभागाने पहारा पथकांची संख्या वाढवून शिराळा आणि परिसरातील सर्व भागांत परिणामकारकपणे कायद्याची कार्यवाही करावी. नागपंचमीच्या दिवशी ध्वनीचित्रीकरण करावे आणि आवश्यक तिथे सी.सी.टी.व्ही. बसवण्यात यावेत. नगरपंचायत आणि वनविभाग यांनी शहरातील प्रमुख रस्त्यावर फ्लेक्स (फलक) लावून, हस्तपत्रके वाटून व्यापक जनजागृती करावी.’’