सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणार्‍या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व

१. ‘सुवर्ण हे शरिरातील प्रतिकूल कीटाणूंचा नाश करते. – ब्राह्मणग्रंथ’

२. सर्व धातूंमध्ये सोने हा सर्वांत सात्त्विक धातू आहे.

३. सोने हा सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करणारा धातू : ‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’ यामुळे सोन्याचे अलंकार परिधान करणार्‍या व्यक्तीला सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.’ – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, या टोपणनावानेही लिखाण करतात, १०.१०.२००५)

४. सोन्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होणे : ‘अलंकार सोन्याचे असल्याने, तसेच सोने हा धातू तेजोमय, म्हणजेच तेजतत्त्व प्रदान करणारा असल्याने या धातूतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीच्या शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन तिच्या आधारे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होऊन संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते.’ – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, या नावानेही लिखाण करतात. १७.१२.२००५)