चातुर्मास्य (चातुर्मास)

सध्या ‘चातुर्मास’ चालू झाला आहे. चातुर्मासाचे महत्त्व, वैशिष्ट्ये काय आहेत? या काळात कोणती व्रते केली जातात ? आदींविषयीची माहिती आमच्या वाचकांसाठी क्रमशः देत आहोत.

श्री गणेशचतुर्थी (श्री सिद्धिविनायक व्रत)

अ. तिथी : ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस म्हणजे श्री गणेशचतुर्थीस आचरण्यात येणारे हे व्रत ‘श्री सिद्धिविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते.

आ. कुटुंबात कोणी करावे ? : हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.’

(श्री गणेशचतुर्थी, तसेच श्री गणेशोत्सव यांविषयी सविस्तर विवेचन सनातनच्या ‘श्री गणपति’ या ग्रंथात केले आहे.)

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’)