|
परभणी – एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकर्यांनी चुना लावला, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. २६ एप्रिल या दिवशी येथील विकासकामांच्या बैठकीसाठी पवार येथे आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस आणि किसान सभेचे कार्यकर्ते यांनी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या वाहनावर चुन्याच्या डब्याही फेकल्या. सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.