एका पोलीस कर्मचार्यासह २ धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद !

पुणे – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा आसाममधील असलेल्या आरोपी शफीऊल याने जानेवारी महिन्यात २५ वर्षीय पीडित तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून आसाममधून पळवून आणले होते. तिची बुधवार पेठेतील (पुणे) वेश्यालयात ५ लाख रुपयांना विक्री केली. तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. आरोपीच्या ओळखीतील एका पोलीस कर्मचार्याने पीडित तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. ४ महिन्यानंतर पीडित तरुणीने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी एका अनोळखी पोलीस कर्मचार्यासह २ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकालोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य, कायद्याचे रक्षकच भक्षक बनतात, त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |