पनवेल येथे आंदोलन

पनवेल – भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांसह त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, खांदा वसाहत, पनवेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केलेल्या आंदोलनात करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, मावळा प्रतिष्ठान, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
रोहा सकल हिंदु समाजाचे आंदोलन !
रोहा – येथे ‘धर्मरक्षक हिंदु सेना’ आयोजित रोहा सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करून श्रद्धांजली वहाण्यात आली. या आंदोलनाला धर्मरक्षक हिदु सेनेचे अध्यक्ष तुषार मोरे, अशोक निकम, तेजस देशमुख, जयेश छेडा, दिलीप धर्मा म्हात्रे, अप्पाशेठ देशमुख, ललित सर, मयुर दिवेकर, सौ. अरूंधतीताई पेंडसे, अजित मोरे, प्रल्हादजी भाटे, सौ. निर्मला भूतकर, यज्ञेश भांड, विनायक पाटील यांसह अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवसेना यांचे नावडे शहरात आंदोलन !
नावडे – पहलगाम येथील हिंदु बांधवांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध म्हणून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नावडे विभागाचे समस्त धारकरी आणि नावडे शहराचे शिवसेनेचे विभागप्रमुख राकेश गोंधळी यांच्या संयुक्त विद्यमाने नावडे शहरात आंदोलन घेण्यात आले. मृत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. या वेळी विविध वक्त्यांनी ‘धर्मांधांवर आर्थिक बहिष्कार घालावा, शासनाने पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी’, असे वक्तव्य केले.
ठाणे येथे आंदोलन !

ठाणे, २६ एप्रिल (वार्ता.) – भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करत कायमचा धडा शिकवावा यासह विविध मागण्या करत हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी येथे आंदोलन केले. आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आंदोलनात बजरंग दल, अखिल भारत हिंदु महासभा, सहयोग गोविंदा पथक, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षर्या केल्या. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.