हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदन

कोल्हापूर – काश्मीरमधील हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर सैनिकी कारवाई करा,

या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.
१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे (जिल्हा कोल्हापूर) प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. विश्वनाथ पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. दीपक भादवनकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनावडे आणि श्री. संजय मुरुकटे उपस्थित होते.
२. चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेनेचे तालुकाध्यक्ष श्री. महांतेश देसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. संदीप नाडगौडा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अनिकेत सावंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील, श्री. संजय दळवी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
३. सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे ‘शहीद अशोक कामटे संघटना’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी सर्वश्री नीलकंठ शिंदे, रवींद्र कुलकर्णी, अरविंद केदार, श्रीकांत देशपांडे, सुखानंद हळीसागर, श्रीकांत चव्हाण, विकास गावडे, गणपत पटेल, गोरख माने, मयूर ढोले, मुकुंद हजारे, मकरंद पाटील, अजय तेली, श्रेयस तोडकरी, संतोष पाटणे, प्रद्युम्न कांबळे, नवनाथ कावळे, गजानन खडतरे, सोमनाथ सुरवसे, प्रा. प्रसाद खडतरे उपस्थित होते.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन