Sanatan Prabhat Exclusive : कुंभमेळ्यात ‘इस्कॉन’च्या शिबिरात आग, १३ तंबू जळून खाक !
कुंभमेळ्यात सेक्टर १८ मधील अलोप-शंकराचार्य चौकातील ‘इस्कॉन’च्या शिबिरामध्ये ७ फेब्रुवारी या दिवशी अनुमाने सकाळी १०.३० वाजता भीषण आग लागली. या आगीमध्ये इस्कॉनच्या शिबिरातील १३ तंबू यांसह पलंग, खुर्च्या, वातानुकूलित यंत्रे, प्रसाधनगृहे, देव्हारा, स्वयंपाकघर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.