काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याकडून तक्रार प्रविष्ट !

  • आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

  • शिष्य आणि अनुयायी यांच्याकडून ठिकठिकाणी आंदोलने

मुंबई – काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे. राज्यात ठिकठिकाणी महाराजांचे शिष्य आणि अनुयायी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ‘वडेट्टीवार यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे. नरेंद्राचार्यजी महाराजांनी स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे महाराज होऊ शकत नाहीत’, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केले.  विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

संपादकीय भूमिका 

मुसलमान धर्मगुरूंच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करण्याचे काँग्रेसच्या किंवा अन्य कोणत्याही नेत्याने केले असते, तर एव्हाना ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा निघाला असता !