श्री हनुमंत कथेनिमित्त ध्वजारोहण पार पडले !
पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा श्री हनुमंत कथा आणि दिव्य दरबार २६ ते ३० डिसेंबर या काळात होणार आहे. त्या निमित्तच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आणि महायज्ञासाठीच्या हवन मंडपाचे भूमीपूजन पार पडले.
पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा श्री हनुमंत कथा आणि दिव्य दरबार २६ ते ३० डिसेंबर या काळात होणार आहे. त्या निमित्तच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आणि महायज्ञासाठीच्या हवन मंडपाचे भूमीपूजन पार पडले.
शास्त्री यांच्या हरिहर मंदिराच्या संदर्भातील विधानाला अमृतसरच्या सुवर्णमंदिराशी जोडले ! वडाची साल पिंपळाला जोडून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा हा प्रयत्न होत आहे का ?, याची चौकशी करणे आवश्यक आहे !
बांगलादेशच नाही, तर भारतातही हेच आवाहन असले पाहिजे ! आता भारतासह जगातील सर्वच हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ याचा विचार करून संघटित झाले पाहिजे !
बागेश्वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्पड मारल्यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत.
हिंदुत्वनिष्ठ विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणार्यांनाही धडा शिकवावा लागणार आहे.
अहिंदू महाकुंभपर्वात पैसे कमावण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी येतात, असेच आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे अशांवर येथे बंदी घालण्याची कुणी मागणी करत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल !
फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे ज्ञान पाजळले जाते; मात्र १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाने फटाके फोडले जातात, तेव्हा ज्ञान कुठे जाते ? तेव्हा प्रदूषण होत नाही का ? दिवाळी आली की प्रदूषण होते का ?
भारतात चित्रपट, प्रसारमाध्यमे, तसेच अन्य माध्यमांद्वारे हिंदूंचे संत, महंत, धर्मगुुरु आणि पुजारी यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केली जाते. याउलट अनेक वासनांध कृत्यात अडकलेले मौलाना किंवा पाद्री यांच्याविषयी काहीही बोलले जात नाही. हिंदूंच्या संतांचा अवमान थांबवण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
भारतात गेली ७५ वर्षे हिंदू मारच खात आले असल्याने आणि सर्वपक्षीय सरकारे हिंदूंच्या रक्षणासाठी काही करत नसल्याने हिंदूंनाही बांगलादेशासारख्या स्थितीला पुढे सामोरे जावे लागेल.
जर आपण आपल्या नावापुढे ‘हिंदु’ लावले, तर इतर देशांतून येणारे लोक आपल्याला हिंदु धर्माच्या नावाने ओळखतील, असे आवाहन येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले आहे.