
दोडामार्ग – कणकवली तालुक्यातील बेळणे येथे गोवंशीयांची अवैधरित्या होणारी वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी २५ एप्रिल या दिवशी रोखली होती. त्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल या दिवशी गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांतून कर्नाटक राज्यात गोवंशीयांची अवैधरित्या वाहतूक करणारे ५ टेंपो गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दोडामार्ग येथे घाटात रोखले. त्यानंतर हे टेंपो पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या टेंपोत एकूण १५ गोवंश होते. टेंपोतून गोवंशाची वाहतूक होणार असल्याचे समजल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी हे टेंपो अडवून गोवंशीयांची तस्करी रोखली.