मुलगा अमली पदार्थ तस्करीत अडकल्याने पाऊल उचलल्याची शक्यता

नवी मुंबई – मुलगा अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यात अडकल्याने नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यात मुलाचा वरीलप्रमाणे उल्लेख आहे.