पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ रस्त्यावर ठेवलेला पाकचा ध्वज उचलून ठेवला दुकानात !

सावंतवाडी – पहलगाम, काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ शहरात रस्त्यावर ठेवलेला पाकिस्तानचा ध्वज काढून तो स्वच्छ करून येथील एका पाकिस्तानप्रेमी धर्मांध मुसलमानाने तो त्याच्या दुकानात नेऊन ठेवला. ही गोष्ट समजल्यावर शहरातील हिंदूंनी संघटित होऊन त्या मुसलमान व्यावसायिकाला खडसावले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. २६ एप्रिलला सकाळी ११ वाजता शहरातील गांधीचौक परिसरात ही घटना घडली. श्री. कृष्णाराजे बीरबसप्पा धुळपनवर (वय २८, रहाणार कोलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फिरोज भाउद्दीन ख्वाजा (वय ५५, रहाणार कोलगाव) याच्या विरोधात राष्ट्रीय एकोप्यास बाधक अशी कृती केल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद केला आहे.
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध म्हणून २५ एप्रिलला सायंकाळी सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदु परिषद यांच्यावतीने गांधीचौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता. या वेळी गांधीचौक परिसरात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर ठेवला होता; मात्र शहरातील एका मुसलमान भाजीविक्रेत्याने पहाटेच्या वेळी कुणीही नसल्याची संधी पाहून तो ध्वज काढून तो त्याच्या दुकानात लपवून ठेवला, एवढेच नाही, तर रस्त्यावर पाकिस्तानचा ध्वज असलेली जागाही त्याने स्वच्छ केली. हे कृत्य तेथील ‘सीसीटीव्ही’मध्ये चित्रीत झालेले होते. हिंदूंनी हा प्रकार कळवल्यानंतर पोलिसांनी त्या मुसलमान भाजीविक्रेत्याला कह्यात घेतले.
हिंदु महिला व्यावसायिकांना दादागिरी करणार्या मुसलमानांनाही दिली समज !
खेडेगावातून येऊन भाजीविक्री करणार्या हिंदु महिलांवर येथील भाजीमंडईमध्ये व्यवसाय करणारे काही मुसलमान भाजीविक्रेते दादागिरी करतात, असे या वेळी समजल्यानंतर दादागिरी करणार्या या मुसलमान भाजी विक्रेत्यांनाही हिंदूंनी खडसावले. काही मुसलमान भाजीविक्रेते ‘दुकानाची आपली जागा आहे’, असे सांगून जागा अडवून ठेवत असल्याचे समजल्यानंतर ‘नगरपालिकेच्या अधिकार्यांनी अवैधरित्या येथे बसणार्यांना उठवले पाहिजे’, अशी मागणी हिंदूंनी केली.
या वेळी सकल हिंदु समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, विश्व हिंदु परिषद प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, कृष्णा धुळापनावर यांच्यासह हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.