
कोल्हापूर – ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने संघाच्या कार्यालयात पहलगाम येथे आतंकवादी आक्रमणात मृत्यू झालेल्या हिंदु बांधवांना श्रद्धांजली वहाण्यात आली. प्रारंभी पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी आतंकवादाचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. नंतर मंत्रपठणाद्वारे दिवंगत हिंदु बांधवांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.