सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्या’चे आयोजन

पुरुषार्थ जागृतीसाठी बजरंग दलाचे मुंबईत शौर्य संचलन !

‘गीता जयंती’चे औचित्य साधून बजरंग दल शौर्य दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. या वर्षी बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात एकूण ४ ठिकाणी शौर्य संचलन/यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीसिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांच्या संख्येत वाढ, कार्यकाळही वाढवला !

मुंबईतील प्रभादेवी येथील स्वयंभू आणि प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांची संख्या ९ वरून १५ इतकी करण्याचा, तसेच विश्वस्त समितीचा कालावधी ३ ऐवजी ५ वर्षे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

धारावी (मुंबई) येथे ‘नशामुक्ती भारत अभियान’ अंतर्गत ‘व्यसनमुक्त फेरी’ काढली !

स्थानिक धारावीकर नागरिक, विविध संस्था, संघटना आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर या दिवशी शीव रेल्वेस्थानक ते ९० फूट मार्ग येथे ‘व्यसनमुक्ती फेरी’चे आयोजन करण्यात आले होते.

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथे दत्त जयंती उत्साहात साजरी !

सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या वैशंपायननगर येथील दत्तभूमीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत १ लाख रुपयापर्यंत वाढ !

नागपूर येथील ‘कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालया’द्वारे प्रतीवर्षी हा पुरस्कार दिला जातो; मात्र मागील ६ पुरस्कारांच्या वितरणाचा निधीही सरकारकडून विश्‍वविद्यालयाला देण्यात आला नव्हता. दैनिक ‘सनातन प्रभात’ने सर्वप्रथम हा प्रकार वृत्ताद्वारे उघड करून वेळोवेळी याविषयीची वृत्ते प्रसिद्ध केली होती.

Punjab Police Receives Alert From NIA : पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पंजाब पोलिसांना दिली माहिती

Narayana Murthy : ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत ! – नारायण मूर्ती,  ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक

आम्हाला आमच्या आकांक्षा उंचवाव्या लागतील; कारण ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत. आपण कष्ट करण्याच्या स्थितीत नसलो, तर कष्ट कोण करणार? तरुणांनी हे समजून घ्यायचे आहे की, भारताला पहिल्या क्रमांकावर आणण्याासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील

Omar Abdullah : काँग्रेसने ‘ईव्हीएम्’चे रडगाणे थांबवावे ! – ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘काँग्रेसने ‘ईव्हीएम्’ अर्थात् ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’च्या सूत्रावरून चालू केलेले रडगाणे थांबवावे. जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता, तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता; मात्र जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुम्ही ‘ईव्हीएम्’वर प्रश्‍न उपस्थित करता. हे योग्य नाही.

Cyclone Chido : फ्रान्सच्या मेयोट बेटावर धडकले ‘चिडो’ चक्रीवादळ !

‘चिडो’ चक्रीवादळ कोमोरोस बेटांवरही धडकले आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ मोझांबिकमध्ये धडकले. तिथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.