नवी देहली – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘काँग्रेसने ‘ईव्हीएम्’ अर्थात् ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’च्या सूत्रावरून चालू केलेले रडगाणे थांबवावे. जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता, तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता; मात्र जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुम्ही ‘ईव्हीएम्’वर प्रश्न उपस्थित करता. हे योग्य नाही. काँग्रेसला ‘ईव्हीएम्’वर विश्वास नसेल तर तिने निवडणूक लढवू नये.’’
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान आणि गृहमंत्री या दोन व्यक्तींनीच घ्यायचा आहे.