कोथरूड (पुणे) येथे ‘दत्तयागा’च्या प्रथम दिवशी विविध राज्यांतील वेदज्ञ ब्राह्मण सहभागी !
पुरुषोत्तम मासात यज्ञ आणि याग करण्याचे महत्त्व !
पुरुषोत्तम मासात यज्ञ आणि याग करण्याचे महत्त्व !
भगवान दत्तात्रेयांची अमोघ कृपा, पितृदोषांतून मुक्ती आणि नवविधा भक्तीचे परम पावन प्रतीक मानला जाणारा ‘नऊ कुंडीय दत्तयाग’ हा आध्यात्मिक विश्वातील अत्यंत दुर्मिळ अन् कल्याणकारी सोहळा मानला जातो. हिंदु धर्माचा प्रसार होण्यासह जनकल्याणार्थ उद्देशाने यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
दत्त यागासाठी ‘श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थाना’चे ११ वे गादीपती प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर हे पूर्ण ३ दिवस उपस्थित रहाणार आहेत.
समाजमाध्यमांवर परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) श्री टेंब्येस्वामी यांच्याविषयी एक खोटी कथा पुष्कळ प्रसारित झाली. त्यातील सर्व संदर्भ खोडसाळपणेच सिद्ध केलेले होते. ‘करुणात्रिपदी’ची रचना होण्यामागे एक महत्त्वाची गोष्ट घडलेली होती, तीच या लेखातून येथे देत आहोत.
सनातन संस्थेकडून ५२ ठिकाणी ‘आध्यात्मिक ग्रंथ’ तसेच ‘सात्त्विक उत्पादने’ यांचे कक्ष लावण्यात आले.
पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला सनातनचे ६६ टक्के पातळीचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी ओवाळले आणि पुष्पहार अर्पण केला.
‘ज्ञानामृतं समरसं गगनौपमोहम्’ म्हणजे आकाशाप्रमाणे असीम, म्हणजे सीमा नसलेले अशा स्वरूपाचे दत्त या संपूर्ण विश्वामध्ये अहर्निश आणि अखंड मुमुक्षू किंवा साधक यांना सांभाळतात अन् त्यांना युगपुरुषाच्या स्वाधीन करतात.’
दत्तात्रेयांकडे महाकाय सिद्धी, म्हणजे विश्वाच्या सर्व स्वरूपांमध्ये एक समयावच्छेदेकरून (एकाच वेळी सर्वत्र) संचारण्याची ही कला आहे.
भिक्षूकरूपाने श्री दत्तात्रेय आले आणि माझ्या घरी भिक्षा करून संतोष पावले. यामुळे माझे पितर कृतार्थ झाले आहेत. धन्य तुझे माता-पिता !’, असे म्हणून त्याने पत्नीला धन्यवाद दिले.
भारतीय संस्कृतीमध्ये विविध पंथ, संप्रदाय आणि त्यांची आराध्य दैवते प्रचलित आहेत. त्यात दत्त संप्रदाय प्राचीन आहे. श्री दत्तात्रेय हे त्यांचे उपास्यदैवत आहे. श्री दत्तात्रेय ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत.