इंदूर (मध्यप्रदेश) – ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा संस्थे’च्या वतीने येथील लालबाग मैदानावर २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ या काळात सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, गोसंवर्धन, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळात संरक्षणाची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदेचा समावेश होता. या वेळी हिंदु संस्कृतीचे वैज्ञानिक तथ्य सांगणारे, तसेच समाज साहाय्याविषयी विविध उपक्रमांच्या माहितीचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शनही लक्षवेधक ठरले.
क्षणचित्रे
१. साधना सत्संगाला येणार्या २ जिज्ञासूंनी ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी येऊन स्वतःहून सेवा केली.
२. कर्नल कुणाल मिश्रा (निवृत्त) हे त्यांच्या ‘विजयंत स्काऊट ग्रुप’च्या मुलांना प्रदर्शन पहाण्यासाठी घेऊन आले होते. संस्थेच्या सौ. संध्या आगरकर यांनी त्या मुलांना अभ्यासापूर्वी प्रार्थना करण्याचे आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व सांगितले.
३. ‘सर्व सनातन’ नावाची स्थानिक वाहिनी चालू करण्याच्या प्रयत्नात असलेले जिज्ञासू श्री. संदीप मिश्रा आणि श्री. दीपक शर्मा म्हणाले की, तुमच्याकडे इतके सुंदर साहित्य आहे. ते आम्हाला ‘ऑडिओ व्हिज्युअल’मध्ये (दृकश्राव्य) करायला आवडेल.
४. येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. पियुष बाथम हे त्यांच्या कुटुंबासमवेत आले होते. या सर्वांनी साधना समजून घेतली.
अभिप्राय
सौ. माधुरी गांगुली, सहारनपूर, मध्यप्रदेश : मी सहारनपूरहून इंदूरमधील लालबाग पॅलेस पहाण्यासाठी आले होते; पण मेळाव्यातील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला अतिशय आनंद झाला.