|
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राजधानी रायपूरच्या महानगरपालिमध्ये तब्बल १५ वर्षांनी भाजपची सत्ता आली आहे. भाजपने राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले. यासमवेत ४९ पैकी ३६ नगरपालिकांवर भाजप, काँग्रेस ७, आम आदमी पक्ष १, तर ५ नगरपालिकांवर अपक्ष निवडून आले आहेत.
राज्यातील रायगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे विजयी उमेदवार चर्चेत असून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला ३४ सहस्र मतांनी पराजित केले. जीववर्धन चौहान असे त्यांचे नाव असून ते चहाचे दुकान चालवतात. चौहान यांनी विजयाचे श्रेय रायगडच्या लोकांसमवेत राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री विष्णु देव साय आणि अर्थमंत्री ओ.पी. चौधरी यांना दिले. दोन्ही नेत्यांनी स्वत: रायगड येथे येऊन चौधरी यांचा प्रचार केला होता.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यमंत्री जीववर्धन चौधरी म्हणाले की, ते पूर्वीही चहा विक्रेते होते आणि आताही चहा विक्रेतेच रहातील. ते त्यांच्या दुकानात राहून लोकांच्या समस्या ऐकतील आणि त्या सोडवतील. रायगडचे महापौर म्हणून विकासकामे करणार असल्याचे या वेळी चौधरी यांनी सांगितले.