शहरी नक्षलवाद वाढण्यामागे काँग्रेसचा हात !

काँग्रेसच्या काळात ज्या नक्षलग्रस्त संघटनांची नावे केंद्र सरकारला पाठवण्यात आली त्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांचीही नावे आहेत. ही मंडळी आजही समाजात कार्यरत आहेत !

रामेश्वर (तालुका देवगड) आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्राचा कारभार सुधारण्यासाठी सरकारने गंभीरपणे लक्ष घालावे !

‘गेल्या १० वर्षांत या केंद्रात आंब्याविषयी कोणतेही संशोधन करण्यात आले तर नाहीच; मात्र वेतनापोटी ५ कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले.

कायदा-सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरले ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

जनतेचे हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी आणि अकार्यक्षम सरकार आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली.

बांगलादेशी घुसखोरांसाठी मुंबईत स्थानबद्धता केंद्र उभारण्यात येणार !

बांगलादेशी घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठी मुंबईत स्थानबद्धता केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

काठमांडू येथे माओवाद्यांची महायुतीविरोधात बैठक !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला, तर पुढे काय करायचे ? या पार्श्वभूमीवर माओवाद्यांची नेपाळची राजधानी काठमांडू येथे बैठक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते.

कोल्हापूर-सांगलीतील नागरिक अन् शेतकरी यांच्या जीविताला-मालमत्तेला हानी न पोचण्यासाठी सरकार पावले उचलेल ! – मुख्यमंत्री

राज्य सरकारने सातत्याने येणारे पुराचे पाणी दुष्काळी भागात वळण्यासंदर्भात १ अहवाल आधीच सिद्ध केला आहे. तो अहवाल वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेला सादर केला आहे. त्यांनी त्याला मान्यता दिली, तसेच ४ सहस्र कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पदे येतात आणि जातात, मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना पुढच्या टप्प्यात संधी देणार ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

ज्यांना मंत्रीपद दिले त्यांच्यात क्षमता आहे आणि ज्यांना दिले नाही त्यांच्यात क्षमता नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आमच्याकडे आमदारांची संख्या अधिक आहे. काही वेळा काही लोकांना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते.

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा परप्रांतीय अखिलेश शुक्ला निलंबित ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्‍या अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतियाला ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’तून निलंबित केले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. 

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाचा दंड कुणाला ?

गड-दुर्ग किंवा प्राचीन स्मारके ही हिंदूंचा दैदीप्यमान वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा हिंदूंमध्ये वीरश्री निर्माण करतात. त्याचे साक्षीदार हे गड-दुर्ग आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे साम्राज्य निर्माण केले नाही.

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर कठोर शिक्षेचे प्रावधान करावे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

कठोर शिक्षेच्या प्रावधानासमवेत तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केल्यास ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग होणार नाही !