पुणे विद्यापिठातील समस्या; विद्यार्थी परिषद मोर्चा काढणार !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. वारंवार निवेदने देऊन आणि चर्चा करूनसुद्धा समस्या न सुटल्याने ६१ मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे विद्यापिठासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाआक्रोश मोर्चा काढणार आहे. (समस्या सोडवण्यासाठी मोर्चा काढावा लागणे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) परीक्षेचे निकाल वेळेत न लागणे, निकाल चुकीचे असणे, निकाल पालटून येणे, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेचा फोलपणा, बोगस महाविद्यालयांचा सुळसुळाट यांमुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा चालू राहील.