America Funding To India Election : भारतातील मतदान वाढवण्यासाठी अमेरिका देत होती १८२ कोटी रुपयांचा निधी !

  • अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे अध्यक्ष इलॉन मस्क यांचा आरोप

  • यू.एस्.ए.आय.डी.कडून दिला गेलेला हा निधी रहित !

(यू.एस्.ए.आय.डी. म्हणजे आंतरराष्ट्रीय विकासासाठीची अमेरिकी संस्था (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डिव्हलपमेंट))

अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे अध्यक्ष इलॉन मस्क

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अब्जाधीश आणि ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (सरकारी कार्यक्षमता विभाग) चे अध्यक्ष इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या जोरावर परदेशात चालवले जाणारे प्रकल्प रहित करण्याचा सपाटाच लावला आहे. मस्क यांनी आरोप केला की, भारतातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकी संस्थांनी भारतात २१ दशलक्ष डॉलर्स (अनुमाने १८२ कोटी रुपये) पाठवले होते.

विशेष म्हणजे बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पालटण्यासाठी दिल्या गेलेल्या २९ दशलक्ष डॉलर्स (अनुमाने २५१ कोटी रुपये) रुपयांचा प्रकल्पही रहित केला आहे. मस्क यांनी ‘यू.एस्.ए.आय.डी.’ला ‘गुन्हेगारी संघटना’ म्हटले आहे. एवढेच नाही, तर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘यू.एस्.ए.आय.डी.’ काही कट्टरतावादी वेडे चालवत होते आणि आम्ही त्यांना बाहेर काढत आहोत.

संपादकीय भूमिका

  • माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या राज्यात ‘डीप स्टेट’कडूनच हा निधी दिला जात होता, हे सर्वश्रुत आहे. भारतातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जो निधी दिला गेला, तो कोणत्या राजकीय पक्षाला आणि कुणाला देण्यासाठी दिला गेला, हेही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही !
  • गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांना मिळणारे ‘इलेक्टोरल बाँड्स’ (भारतात राजकीय पक्षांना निधी देण्याची पद्धत) रहित करण्यासाठी काँग्रेसने आकाशपाताळ एक केले होते. आता अमेरिकी निधीचा विषय समोर आला आहे. यामुळे काँग्रेसलाच अमेरिकेतील हा निधी मिळाला होता का, याची चौकशी झाली पाहिजे !