पटवर्धन सरकार यांच्या श्री मांदार गणेशाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

पटवर्धन सरकार यांच्याकडे असलेली श्री मांदार गणेशाची मूर्ती

मिरज, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – कागवाड येथील पटवर्धन सरकार कुटुंबियांचे जागृत उपास्य दैवत असलेल्या श्री मांदार गणेश मंदिराचा २० फेब्रुवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण समारंभ होत आहे. २० फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता श्री मांदार गणेशमूर्ती आणि कळस यांची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक आणि मंदिरात आरती होईल.

२२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता कळसारोहण होईल, तर दुपारी १२ वाजता श्री मांदार गणेशाची आरती होणार आहे. हा सोहळा आमदार श्री. भरमगौड (राजू) कागे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या अमृतहस्ते होणार आहे. दुपारी १२.३० नंतर भाविकांसाठी महाप्रसाद असेल. अत्यंत प्राचीन असलेल्या मंदिराची स्थापना वर्ष १८५५ (शके १९७७) मध्ये झाली आहे. तरी कार्यक्रमांना अधिकाधिक भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधिवक्ता समीर पटवर्धन, समस्त कागवाडकर कुटुंबीय आणि पटवर्धन सरकार कुटुंबीय यांनी केले आहे.