Bangladesh Hindu Temple Attacked : बांगलादेशातील मुसलमानांकडून मंदिरातील देवीची मूर्ती नष्ट !

हिंदु दुकानदाराला लुटले, पत्नीवर आक्रमण !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यातील नझीरपूर उपजिल्ह्यात १४ फेब्रुवारीच्या रात्री मुसलमान जमावाने एका हिंदु कुटुंबावर, तसेच दुर्गा मंदिरावर आक्रमण केले. या वेळी देवीची मूर्ती तोडफोड करून नष्ट करण्यात आली. १५-२० कट्टरतावादी मुसलमानांच्या या जमावाने रेवती गायेन या हिंदु दुकानदाराच्या दुकानातील सामान लुटले. तसेच त्यांची पत्नी बिथी गायेन यांच्यावर आक्रमण केले.

१. कुटुंबाच्या साहाय्यासाठी धावलेल्या स्थानिक हिंदूंवरही जमावाने आक्रमण केले. यामध्ये १० हिंदू घायाळ झाल्याचे वृत्त आहे.

२. श्री दुर्गा मंदिर समितीचे अध्यक्ष मिलन गायन आणि त्यांची पत्नी इराणी गायन यांचाही घायाळ झालेल्यांमध्ये समावेश आहे.

३. आक्रमण करणार्‍यांच्या हातात रॉड आणि पाईप होते.

४. आक्रमण करणार्‍यांपैकी छब्बीर शेख, मुस्तकीन शेख आणि नयन शेख यांना अटक करण्यात आली असून अन्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

५. मुसलमानांनी हिंदु व्यावसायिकाला शारीरिक इजा करण्याची धमकी दिली आणि तेथून पळून गेले.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे सत्र चालूच असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर बांगलादेशाचे दायित्व सोपवले आहे. तेथील हिंदूंवरील आक्रमणे थांबण्यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न करावेत, असे भारतातील हिंदूंना वाटते !