युद्ध नको असेल, तर पाकने पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवावे ! – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकच्या हिताचा विचार असेल, तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या प्रकरणात इंंग्लंडच्या आर्चबिशपची क्षमायाचना

ब्रिटीश सरकार आजही इंग्रजांनी भारतियांवर केलेल्या अत्याचारांविषयी क्षमा मागण्यास टाळते. त्यामुळे ब्रिटीश धर्मगुरूंनी क्षमायाचना करून उपयोग नाही, तर त्यांनी ब्रिटीश सरकारलाही क्षमा मागण्यास भाग पाडणे आवश्यक !

आम्हाला भारतात राजकीय आश्रय द्या !

पाकच्या सत्ताधारी पक्षातील माजी शीख आमदारही पाकमध्ये सुरक्षित नसेल, तर तेथील अन्य हिंदू आणि शीख यांची स्थिती काय असेल, याचा विचारही न केलेला बरा !

बटाला (पंजाब) येथील फटाक्यांच्या कारखान्यांतील स्फोटात २३ जण ठार

शहरात असणार्‍या एका फटाक्यांच्या कारखान्यात ४ सप्टेंबरला मोठा स्फोट होऊन त्यात २३ जण ठार झाले, तर २५ पेक्षा अधिक जण घायाळ झाले.

भारतीय वायूदलात अमेरिकेचे ८ अत्याधुनिक ‘अपाचे’ हेलिकॉप्टर समाविष्ट

जगातील सर्वांत बलाढ्य आणि शक्तीमान ‘अपाचे’ हेलिकॉप्टर भारतीय वायूदलामध्ये समाविष्ट झाले आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांनी वायूदल प्रमुखांसमवेत मिग-२१ मधून उड्डाण केले 

पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ्-१६ हे लढाऊ विमान पाडल्यामुळे वीर चक्र पुरस्कार मिळालेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथील सैन्य विमानतळावरून वायूदलप्रमुख बी.एस्. धनोआ यांच्यासमवेत मिग-२१ विमानामधून उड्डाण केले.

भारताने पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

वर्ष १९४७ मध्ये नेहरू यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न नेऊन ठेवला. आता पंतप्रधान मोदी यांनी तो तेथून मागे घेतला पाहिजे.

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याला अटक

पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयला देशाच्या सुरेक्षिततेशी संबंधित गोपनीय माहिती पुरवणार्‍या रमकेश मीना या चतुर्थ श्रेणीच्या रेल्वे कर्मचार्‍याला पंजाब पोलिसांनी अटारी स्थानकावरून अटक केली आहे.

भटिंडा (पंजाब) येथे गोशाळेचे छप्पर कोसळल्याने १०० हून अधिक गायी दबल्याची शक्यता

१६ जुलै या दिवशी येथे असलेल्या एका गोशाळेचे छप्पर  कोसळल्याने त्याखाली १००हून अधिक गायी दबल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र

पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. ‘या त्यागपत्रास सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यातील मतभेद कारणीभूत आहेत’, असे म्हटले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF