राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पंजाब पोलिसांना दिली माहिती
जालंधर (पंजाब) – पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांनी आक्रमणे करून दहशत निर्माण करण्याचा कट रचला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पंजाब पोलिसांना दिली आहे. आक्रमणांमध्ये पहिले लक्ष्य पंजाब राज्यातील पोलीस ठाणी असतील, असे यात सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील ५ पोलीस ठाण्यांवर हातबाँब आणि बाँब यांद्वारे आक्रमणे झाली आहेत.
वर्ष १९८४ मध्ये ज्या प्रकारे खलिस्तान्यांनी परिसरातील एखादी व्यक्ती, इमारत किंवा संस्था यांना लक्ष्य करत राज्यात आक्रमणे केली होती, त्याच प्रमाणे ही आक्रमणे असू शकतात, असे या माहितीत म्हटले आहे. अशा आक्रमणांसाठी स्थानिक लोकांना आतंकवादी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाकिस्तानच्या साहाय्याने खलिस्तानी आतंकवादी घातपात करण्याची शक्यता
खलिस्तान टायगर फोर्स, बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इतर खलिस्तानी आतंकवादी संघटना चिनी उपकरणांचा वापर करत आहेत. अशी उपकरणे यापूर्वी अन्वेषण यंत्रणेने जप्त केली आहेत. ही उपकरणे काही देशांच्या सैन्याने वापरली आहेत. अशा परिस्थितीत हे खलिस्तानी आतंकवादी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या (इंटर सर्व्हिस इंटलिजन्स) सहकार्याने काम करत आहेत.
संपादकीय भूमिका
|