
मुंबई – मुंबईसह राज्यात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणार्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यशासन कठोर पावले उचलत आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती महिला आणि संस्कृती यांच्या रक्षणाचे काम करील. ही समिती इतर राज्यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधी, तसेच फसवणूक करून केलेल्या धर्मांतराच्या विरोधातील कायद्याचा अभ्यास करून राज्यातील कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी सरकारकडे शिफारस करणार आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत बोलतांना केले. समिती स्थापन केल्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मुंबईसह महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार!
लव्ह जिहाद प्रकरणात निष्पाप हिंदू मुलींच्या कोणी हत्या… pic.twitter.com/UvxOqZQzDA
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 15, 2025
मंत्री लोढा म्हणाले,…
१. लव्ह जिहादच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे लव्ह जिहादचे समर्थन केले होते. आमदार रईस शेख हे लव्ह जिहाद प्रकरणाचे समर्थक आहेत का ?
Maharashtra Minister Mangal Prabhat Lodha @MPLodha praises CM Devendra Fadnavis for forming a 7-member committee to tackle this growing issue of Love J|h@d
👉 This is a long-standing demand of Hindus considering the drastic increase of incidents of ‘Love J|h@d’ in Mumbai and… https://t.co/I4tY7gBRHx pic.twitter.com/QhIiBpodiD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 15, 2025
२. ‘आफताबने श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. इक्बाल शेखने रूपाली चंदनशिवे हिची हत्या केली. पूनम क्षीरसागर या तरुणीला निजाम खानने मारले. उरणच्या यशश्री शिंदेला दाऊद शेखने मारले. मालाडच्या सोनम शुक्ला हिला शहाजीब अन्सारीने ठार केले. या लव्ह जिहाद प्रकरणातील हत्या कुणी केल्या ? कोणत्या भावनेने केल्या ? हे समोर दिसत असतांनासुद्धा ‘लव्ह जिहादसारखे काहीच घडत नाही’, असे तुम्ही कसे म्हणू शकता ?’ असा प्रश्न मंत्री लोढा यांनी आमदार रईस शेख यांना केला.