Lalu Yadav Calls Kumbh Useless : (म्हणे) ‘कुंभाला काही अर्थ नाही, ती फालतू गोष्ट !’

  • राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांचा हिंदुद्वेष

  • देहलीत झालेल्या चेंगराचेंगरीला रेल्वेमंत्री उत्तरदायी असल्याचा केला आरोप !

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव

नवी देहली – कुंभमेळ्याला काही अर्थ नाही. ती फालतू गोष्ट आहे, असे संतापजनक वक्तव्य बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले. देहलीत झालेल्या रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरीवरून यादव यांनी वरील वक्तव्य केले आहे.

यादव यांनी अपघातासाठी रेल्वे विभागाला उत्तरदायी धरले असून रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना या घटनेचे दायित्व घेण्याची मागणी केली आहे. यादव म्हणाले की, या घटनेत सहभागी असलेल्या सर्व लोकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. ही रेल्वेची चूक आहे, रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे इतके लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

यादव यांच्या या वक्तव्यावरून ते रेल्वेमंत्री असतांना वर्ष २००४ मध्ये छठपूजेच्या वेळी देहली रेल्वेस्थानकावर अशा प्रकारचीच चेंगराचेंगरी झाल्याची आठवण सामाजिक माध्यमांतून लोक त्यांना करून देत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भाजप सत्तेत असल्याने लालू प्रसाद यादव अशा प्रकारे राजकारण करत आहेत. माजी रेल्वेमंत्री असल्याने या घटनेवरून आता खरेतर त्यांना त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याची संधी मिळाली आहे, एवढेच !
  • ५० कोटींहून अधिक हिंदू ज्या महाकुंभमेळ्यात संगमस्नान करतात, तिथे अशा प्रकारचे विधान हे हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवण्यासारखेच आहे. हिंदूंनी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पक्षाला लक्षात ठेवून, त्यांना ‘फालतू’ ठरवून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचेच दायित्व आता घेतले पाहिजे !