४ जण घायाळ
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – दक्षिण ऑस्ट्रियाच्या कॅरिंथिया प्रांतात असलेल्या व्हिलाच शहरातील ही घटना आहे. १५ फेब्रुवारीला सीरियन वंशाच्या एका २३ वर्षीय व्यक्तीने ५ जणांवर चाकूने आक्रमण केले. यात १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले. घटनेनंतर आक्रमणकर्त्याला कह्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. तो ऑस्ट्रियामध्ये कायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
१. ‘सी.एन्.एन्.’ने दिलेल्या वृत्तानुसार यामागील हेतू त्वरित कळू शकलेला नाही, असे पोलीस म्हणतात.
२. कॅरिंथिया प्रांताचे गव्हर्नर पीटर कैसर म्हणाले की, या भयानक अत्याचाराचे कठोर परिणाम भोगावे लागतील.
३. गृह मंत्रालयाच्या मते, वर्ष २०२४ मध्ये २४ सहस्र ९४१ परदेशी लोकांनी ऑस्ट्रियामध्ये आश्रयासाठी अर्ज केला होता. यांपैकी सर्वांत मोठा गट हा सीरियन वंशियांचा होता, तर त्यानंतर अफगाणिस्तानी लोकांचा क्रमांक लागतो.
४. ऑस्ट्रियात गेल्या वर्षीच झालेल्या निवडणुकीत ‘स्थलांतर’ हा एक प्रमुख विषय होता. निवडणुकीत कट्टर राष्ट्रवादी ‘फ्रीडम पार्टी’ला ७० वर्षांनी विजय मिळाला.
५. कट्टर राष्ट्रवादी नेते हर्बर्ट किकल यांनी ‘एक्स’वर म्हटले की, ते व्हिलाचमधील भयानक कृत्याने स्तब्ध झाले आहेत.
संपादकीय भूमिका‘अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात’, हे केवळ भारतातच नव्हे, तर युरोपातील घटनांतूनही लक्षात येते ! |