योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या संदर्भात साधकाला झालेला स्वप्नदृष्टांत !

स्वप्नात योगतज्ञ दादाजी यांनी दैवी पूजा केलेल्या भक्ताला साधकाने नंतर प्रत्यक्षात संपर्क करणे, तेव्हा त्या भक्ताने त्याच्या अडचणींच्या संदर्भात योगतज्ञ दादाजींना प्रार्थना केल्याचे सांगणे

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अन्नाविषयी अनमोल शिकवण

योगतज्ञ दादाजी सांगत, ‘अन्न सिद्ध करणार्‍यांचे विचार कसे असतात ?’, हे आपल्याला माहीत नसते. त्यांचे विचारच अन्नामध्ये उतरतात. अन्न सिद्ध करणारी व्यक्ती आणि तिचे विचार यांवर अन्नाची शुद्धता अवलंबून असते, तसेच अन्न सिद्ध करतांना त्या ठिकाणची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते.’

‘साधकांनी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी नेहमी सत्याचा बोध घ्यावा !’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

साधक असत्य बोलले, तर ते पुण्यमय शिदोरीत जमा होत नाही. साधकांनी नेहमी सत्य बोलावे. सात्त्विक वृत्तीच्या साधकांनी प्रगती करण्यासाठी सत्याचा बोध घ्यावा.

 ‘करुणाकर’ योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘स्वाईन फ्लू’ या रोगातून जिवंत रहाण्याची निश्चिती नसलेल्या रुग्णाला योगतज्ञ प.पू. दादाजींनी मंत्रासह ‘दैवीकवच’ सिद्ध करून दिल्याने रुग्ण बरा होणे 

स्नेही निर्धन असला तरी चालेल; पण सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो.  

स्वतःवर प्रयोग करून ‘मंत्रसामर्थ्य आणि उचित साधना’ यांद्वारे प्रारब्धावरही मात करता येते’, हे सिद्ध करून दाखवणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजी यांच्या घराण्यातील सहा पिढ्यांमध्ये एकुलता एकच पुत्र असण्याची परंपरा होती. भृगुसंहितेमध्ये योगतज्ञ दादाजींच्या संदर्भातही तशीच नोंद होती; परंतु मंत्रसामर्थ्याने त्यात पालट करून त्यांनी दोन पुत्ररत्नांच्या प्राप्तीचा लाभ करून घेतला.

साधकाचे ध्येय सिद्धीप्राप्ती हे नसून मुक्तीप्राप्ती असावे ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सिद्धी म्हणजे आध्यात्मिक मार्गाच्या प्रगतीमधील परमेश्वराने दिलेली प्रलोभने आहेत. त्यांचा उपयोग आवश्यक असेल, तेव्हा लोककल्याणासाठीच केला, त्या सिद्धींमध्ये गुंतून न रहाता आध्यात्मिक वाटचाल तशीच नेटाने चालू ठेवली, तर अंती आत्म्याचा उद्धार होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होणे शक्य होते…

प्रीतीस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजी यांच्यामध्ये उत्साह आणि उमेद तरुण मनुष्याला लाजवण्या इतपत प्रखर आहे. आपल्या दैवी कार्यात एकही चूक होणार नाही’, याची सर्वतोपरी काळजी ते स्वत: जातीने घेतात.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

‘साधनेबरोबरच साधकांनी आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. त्यासाठी वरचेवर मनाला न्याहाळून पहावे, ‘चुकून माझ्या मनाला इर्षेचे काही विचार चिकटले नाहीत ना ?’ एका इर्षेपायी बरेच दुर्गुण मनाला घेरून टाकतात…

मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !

‘घर कितीही स्वच्छ असले, तरी त्याची नियमित झाडलोट करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.