प्रयागराज, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यात त्रिवेणी आणि गंगा स्नानासाठी भाविकांची पुन्हा प्रचंड गर्दी होत आहे. यामध्ये चारचाकी गाडी येऊन येणार्या भाविकांची संख्या अधिक आहे. महाकुंभक्षेत्रात येत असलेल्या गाड्यांचे वाढते प्रमाण पाहून पोलिसांनी संगम भागात जाणारी वाहतूक रोखली आहे. त्यामुळे भाविक त्रिवेणी संगमापासून दूर अंतरावर गाड्या लावून २-३ किलोमीटर चालून स्नानासाठी जात आहेत.
शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्यामुळे १५ फेब्रुवारीपासून भाविकांची कुंभक्षेत्रातील गर्दी पुन्हा वाढली आहे. १५ फेब्रुवारीच्या संपूर्ण रात्रभर त्रिवेणी संगमावर स्नानासाठी जाणार्या भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढतच आहे. अपंग व्यक्तीसाठी चारगाडीत चाकाची आसंदी ठेवूनही अनेक भाविक चाकाच्या खुर्चीवरून त्रिवेणी संगमावर स्नानासाठी अपंग व्यक्तींना त्रिवेणी संगमावर स्नानासाठी नेत आहेत. एकूणच भाविकांचा कुंभक्षेत्रात स्नान करण्याचा उत्साह आणि वाढता ओघ पहाता महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभक्षेत्रात भाविकांची गर्दी कायम रहाण्याची शक्यता दिसत आहे.