हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

भक्तांच्या संदर्भात कलियुगातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची स्थिती !

‘जो आवडतो देवाला । तोची नावडे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

नास्तिकतावादी आणि राष्ट्रघातकी विचारांच्या कम्युनिस्ट सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

मराठी भाषेसाठी योगदान देणार्‍यांनाच मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रित करणे उचित आहे ! गेल्या अनेक वर्षांपासून तसे होत नसल्यामुळेच साहित्य संमेलनाची पत झपाट्याने घसरत आहे ! याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी बोलतील का ?

पाकिस्तानमध्ये ११ वर्षांच्या हिंदु मुलाची लैंगिक शोषण करून हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानवयातच समष्टी धर्मकार्याला प्रारंभ केला. त्यामुळे समष्टी सेवा करणारे हे आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे.

श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळल्याने पुजार्‍याने रुग्णालयात जाऊन मूर्तीवर करून घेतले उपचार !

भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळल्याने तो बसवण्यासाठी एक कृष्णभक्त पुजारी आधुनिक वैद्यांना हात पुन्हा बसवून देण्याची विनंती केल्यावर त्यांनी पट्टी बांधून मूर्तीचा हात पुन्हा बसवून दिला.

भाजपचे सरकार असतांनाही एस्.टी.चे विलीनीकरण झाले नव्हते ! – महादेव जानकर, नेते, भाजप

रस्त्यावर असतांना एक बोलावे लागते आणि आत गेल्यावर एक असते. त्यामुळे हा पद्धतीचा भाग आहे. त्यामुळे जनतेने हुशार झाले पाहिजे, हाच त्यावरचा एक पर्याय आहे. भाजप सरकारच्या काळातही एस्.टी.चे विलीनीकरण झाले नव्हते.

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना हानीभरपाईसाठी ८ कोटी संमत !

तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाकडून साहाय्य मिळण्याच्या प्रतीक्षेत होते; मात्र आमदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी असंख्य वेळा पाठपुरावा केल्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी हा निधी संमत केला आहे.