सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळाला नाही ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘‘दुसरा गाल पुढे करून भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. भारताला वर्ष १९४७ मध्ये भीक मिळाली होती, स्वातंत्र्य मिळाले नाही. खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यावर मिळाले.’’ – अभिनेत्री कंगना राणावत

जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

पंचतारांकित उपाहारगृहांतील वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून शेतकर्‍यांच्या प्रदूषणावर बोलले जात आहे ! – सर्वोच्च न्यायालय

‘आपण या वास्तवाकडेही डोळेझाक करतो की, बंदी असूनही फटाके सर्रासपणे फोडले जात आहेत’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.

मालेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांची रझा अकादमीच्या कार्यालयावर धाड !

विविध दस्तऐवज आणि कागदपत्रे जप्त !
हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या ४१ वर !

सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घातली नाही, तर आत्मदहन करणार ! – अयोध्येतील तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांची चेतावणी

संतांना अशी मागणी आणि त्यासाठी अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकारने स्वतःहून हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिजे !

मशिदींना कोणत्या कायद्याच्या कलमांतर्गत भोंग्यांचा वापर करण्याची अनुमती आहे ? – कर्नाटक उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्‍न

भोंग्याचा वापर रोखण्यासाठी ‘ध्वनी प्रदूषण नियम, २०००’ नुसार कोणती कारवाई केली जात आहे, याचीही माहिती द्यावी, असे न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.

राजस्थानमध्ये स्थानांतर करून घेण्यासाठी सरकारी शिक्षकांना द्यावी लागते लाच !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रश्‍नावर शिक्षकांनी दिली स्वीकृती !

पाकने काश्मीरवरील अवैध नियंत्रण सोडावे ! – भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकला सुनावले

केवळ असे सुनावून पाक काश्मीरवरील नियंत्रण सोडणार नाही, तर त्याच्याशी युद्ध करूनच त्याने गिळंकृत केलेले भूभाग परत मिळवावे लागणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे !

३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रातून बाहेर पडलेला भूप्रदेश भारताचा होता ! – संशोधनाचा निष्कर्ष

हे संशोधन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वैज्ञानिकांनी मिळून केले आहे. ‘त्या काळात समुद्रातून जो भाग सर्वांत आधी बाहेर पडला, तो सध्याच्या झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्याचा असू शकतो’, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण

यावरून समाजात पोलिसांचा किती वचक आहे, हे लक्षात येते ! अशा नागरिकांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !