बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी बोलतील का ? – संपादक 

सिलहट (बांगलादेश) – येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवरात्रोत्सवात बांगलादेशातील कोमिल्ला येथे धर्मांधाने श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवल्याने दंगल उसळली होती. तसाच प्रकार येथे करण्याचे षड्यंत्र होते का ? हे स्पष्ट झालेले नाही.