शिवोलीचा भावी आमदार कोण ? हे जनता ठरवणार ! – मायकल लोबो, कचरा व्यवस्थापनमंत्री

लोबो पुढे म्हणाले, ‘‘माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे गोव्याला सदोदित पुढे नेण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटले. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कटीबद्ध आहे.

मंत्री मायकल लोबो हे भाजपचेच, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजपचे गोव्यातील निवडणुकीचे पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हे स्थानिक पक्षांशी युती करण्यासाठी चर्चा करत आहेत’’, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोमंतकीय चित्रपटांच्या विशेष विभागाला लागू केलेला निर्बंध हटवला

पूर्वी ‘गोवा मनोरंजन संस्थे’ने ‘आंचिम’मध्ये गोमंतकीय चित्रपटांच्या ४ हून अधिक प्रवेशिका आल्या, तरच विशेष विभाग असणार’, अशी अट घातली होती.

‘पर्यटक टॅक्सीं’ना ‘डिजिटल मीटर’ बसवण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवा ! – उच्च न्यायालयाची शासनाला सूचना

न्यायालयाला असे सांगावे लागू नये !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा आणि सौ. प्रयागबाई टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान

जयपूर (राजस्थान) येथील महाविद्यालय परिसरात नमाजपठणाला विरोध !

अ.भा.वि.प.कडून हनुमान चालीसाचे पठण
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे धर्मांधांकडून असे प्रकार होणारच !

गलवान खोर्‍यातील संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकाचे छायाचित्र प्रसारित करणार्‍याला ७ मासांची कारावासाची शिक्षा

लडाखमधील गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यातील संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनचे ४५ हून अधिक सैनिक ठार झाले होते.

मोरबी (गुजरात) येथून ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये ३५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापूर्वी ९ सहस्र कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची अमानुष मारहाण करून हत्या

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार असल्यावर हिंदूंच्या आणि हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. भविष्यात या हत्या होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तेथील हिंदुत्वनिष्ठांच्या रक्षणाचा प्रयत्न करावा, असे हिंदूंना वाटते !

वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कठोर दळणवळण बंदी लावू शकतो ! – देहली सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन

सरकारने पुढे म्हटले की, दळणवळण बंदीमुळे हवेच्या गुणवत्तेत फारसा फरक पडेल, असेही नाही. वायू प्रदूषणाच्या सूत्रावर व्यापक स्तरावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.