मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी केलेल्या कानउघाडणीनंतर ‘दैनिक लोकपत्र’च्या कार्यकारी संपादकांकडून जाहीर क्षमापत्र प्रसिद्ध

‘दैनिक लोकपत्र’मधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अश्‍लाघ्य लिखाण केल्याचे प्रकरण

शासकीय कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींचा राजशिष्टाचारानुसार मान राखण्याविषयी शासनाने आदेश काढला !

लोकशाहीत मालक असलेली जनता जेव्हा स्वतःच्या प्रश्‍नांविषयी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देते, तेव्हा अधिकारी आसंदीतून साधे उठूनही उभे रहाण्याचीही माणूसकी दाखवत नाहीत ! याविषयी कधी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे का ?

मशिदीजवळ डीजे बंद करण्यास सांगणार्‍यास धर्मांधांकडून मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी नासिर, नाझिम, आरिफ, रिझवान, शाहबाज आणि इतरांवर प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवला असून अधिक अन्वेषण करण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा होणार !

पाकच्या संसदेत कायदा संमत
पाकमध्ये असा कायदा करता येऊ शकतो, तर भारतात का नाही ?

अरुणाचल प्रदेश येथे वायूदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

अरुणाचल प्रदेश येते भारतीय वायूदलाचे ‘एम्आय-१७’ हे हेलिकॉप्टर कोसळले. यातील २ वैमानिक आणि ३ कर्मचारी बचावले. या हेलिकॉप्टरने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत कुठे ? याची माहिती आम्हाला द्या !

‘तुमचा व्यवस्थेवर किती अविश्‍वास आहे ते पाहा. आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत. ‘न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते प्रकट होतील’, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?’ – सर्वोच्च न्यायालय

सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यास देहली येथील न्यायालयाचा नकार

केंद्र सरकारने स्वतःहूनच या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिज, असे हिंदूंना वाटते ! काँग्रेसच्या राजवटीत मुसलमानांनी मागणी केल्यानंतर सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात आली होती. ‘

(म्हणे) ‘मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे !’

भारतात कुठेही मुसलमानांच्या विरोधात हिंसा होत नाही, उलट धर्मांधांकडूनच देशात ठिकठिकाणी हिंदूंवर आक्रमणे केली जातात, ही वस्तूस्थिती आहे !

इजिप्तच्या वाळवंटात सापडले ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे प्राचीन सूर्यमंदिर !

इजिप्तमधील अबू गोराबच्या वाळवंटात पुरातत्व विभागाला सूर्यमंदिर सापडले आहे. हे मंदिर ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही इजिप्तमध्ये एक सूर्यमंदिर सापडले होते.