जम्मू-काश्मीरमध्ये १० सहस्र घुसखोर रोहिंग्या !

रोहिंग्यांना साहाय्य करणार्‍या ६ स्वयंसेवी संघटनांची केली जात आहे चौकशी

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये सध्या १० सहस्र रोहिंग्या मुसलमान बेकायदेशीररित्या रहात असून त्यांना येथे वसवण्यासाठी साहाय्य करणार्‍या ६ स्वयंसेवी संघटनांची पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. या संघटनांनी रोहिंग्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड आदी सरकारी कागदपत्रे बनवण्यात साहाय्य केले. १० सहस्रांपैकी ६ सहस्र रोहिंग्या जम्मू जिल्ह्यात आले, तर उर्वरित सर्व काश्मीर खोर्‍यात रहात आहेत. त्यांच्या वसाहती जम्मू रेल्वे स्थानक, कासिमनगर, चन्नी रामा, नरवाल येथे आहेत.

रोहिंग्यांना कागदपत्रे बनवून देणार्‍या अधिकार्‍यांच्या होत आहेत चौकशा !

२०० हून जास्त रोहिंग्यांनी अवैध पद्धतीने आधार आणि रेशन कार्ड मिळवले आहेत. जम्मूच्या उपायुक्तांनी घरमालकांसाठी भाडेकरू ठेवतांना त्यांची कागदपत्रे दाखवणे अनिवार्य केले आहे. योग्य कागदपत्रांविना भाडेकरू ठेवल्यास घरमालकांवर गुन्हा नोंदवण्यात  येणार आहे. तसेच ज्या सरकारी अधिकार्‍यांनी रोहिंग्यांना सरकारी कागदपत्रे बनवून देण्यास साहाय्य केले, त्यांचीही चौकशी केली जात आहे, असे एका अधिकार्‍याने सांतिले.

रोहिंग्या तरुणी स्थानिकांसमवेत करत आहेत विवाह !

हे घुसखोर रोहिंग्या बांगलादेश, बंगाल आणि आसाममार्गे म्यानमारमधून येथे आले. पोलीस रोहिंग्या तरुणींच्या कथित तस्करीचीही चौकशी करत आहेत. १८० हून अधिक रोहिंग्या तरुणींनी स्थानिक तरुणांसमवेत विवाह केला आहे. असे विवाह रोहिंग्या कुटुंबाच्या कायमस्वरूपी सुविधांसाठी केले जात आहेत. नियोजनाद्वारे हे विवाह होत आहेत. यामुळे घुसखोरांना पोलिसांच्या नजरेतून वाचता येते.

संपादकीय भूमिका

कोणताही इस्लामी देश रोहिंग्यांना स्वीकारण्यास नकार देत असतांना हे मुसलमान भारतात घुसखोरी करत सुखाने रहात आहेत, हे भारतीय प्रशासन आणि सुरक्षायंत्रण यांना लज्जास्पद आहे !