पनवेल – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या अमानुष हत्या, तसेच हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या निषेधार्थ आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने कळंबोली (पनवेल) येथे विशाल ‘निषेध आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या वेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु धर्माभिमान्यांनी विविध मागण्या केल्या.
मोर्चात केलेल्या मागण्या !
१. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी तेथील हिंदूंना आवश्यक सैन्य/लष्करी/हवाई दल बल पाठवावे.
२. बांगलादेशी घुसखोरांचे सूत्र संयुक्त राष्ट्र संघात भारत सरकारने तातडीने मांडावे आणि त्यावर उपाययोजनेसाठी तत्परतेने प्रयत्न करावेत.
३. बांगलादेशातील अराजकतेमुळे जे हिंदू भारताला शरण आलेले आहेत, त्यांची त्वरेने चौकशी आणि पडताळणी करून त्यांना ‘सीएए’ अंतर्गत कायद्याप्रमाणे मान्यता द्यावी.
४. भारतीय सीमा सुरक्षा दलाला निर्देश देऊन सीमा बंदोबस्त कडक करण्यात यावा.
५. कळंबोलीमध्ये अनेक घुसखोर दिसून येत आहेत, तसेच गल्लोगल्ली चिकन/ मटन यांची दुकाने विनापरवाना उघडलेली आहेत. त्यांची त्वरित चौकशी आणि पडताळणी करून त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी.
बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा ! – उमाकांत गायकवाड, संविधान सन्मान मंच, अध्यक्ष
ज्या भारताने बांगलादेशाला स्वातंत्र्य दिले, त्याच भारतातील पाळेमुळे नष्ट करण्यासाठी कोट्यवधी बांगलादेशी घुसखोर भारतात पोटाची आग विझवण्यासाठी नियोजनपूर्वक आलेले आहेत. एकदा का पोटाची आग विझली की, त्यानंतर वासनेची आग विझवण्यासाठी ते नक्कीच हिंदु मुली-महिला यांना लक्ष्य करून जिहाद करतील; म्हणून जे बांगलादेशी घुसखोर मुसलमान येथे रहात आहेत, त्यांना हाकलून द्यायला पाहिजे.
‘सर्व राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी हिंदूंनी या गोष्टीचा विरोध करावा’, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले.
क्षणचित्रे
१. कु. जान्हवी शिंदे (इयत्ता १२ वी) हिने ‘हिंदु तन-मन हिंदु जीवन, रग रग हिंदु मेरा परिचय’ ही कविता म्हणून दाखवली.
२. श्री. उमाकांत गायकवाड यांनी भाषणानंतर ‘वन्दे मातरम्’ म्हटले.
३. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.