कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंजेलिजन्स) तंत्रज्ञानाचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये आणखी एका भारतियाला स्थान दिले आहे. त्यांनी भारतीय अमेरिकी उद्योजक, भांडवलदार आणि लेखक श्रीराम कृष्णन् यांची ‘व्हाईट हाऊस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ कार्यालयात कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंजेलिजन्स) तंत्रज्ञानाचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केली. श्रीराम कृष्णन् यांनी यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, याहू, फेसबुक आणि स्नॅप या आस्थापनांमध्ये काम केले आहे. नियुक्तीच्या घोषणेनंतर कृष्णन् म्हणाले की, मी माझ्या देशाची सेवा करण्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही.