शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी गडांवर विसर्जन करणार नाही ! – मनसेचा खुलासा 

बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी गडकिल्ल्यांवर विसर्जन करण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कराव्यात, असे ट्वीट वरपे यांनी केले होते. त्यावर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी खुलासा केला आहे.

आंध्रप्रदेशात पुरामुळे १७ जणांचा मृत्यू, तर १०० जण बेपत्ता

वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे.

(म्हणे) ‘धर्मांतरविरोधी कायद्यामुळे कर्नाटकात अराजकता निर्माण होईल ! – आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो

धर्मांतरविरोधी कायदा केल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या खरा उद्देशच अयशस्वी होणार असल्याने ते आता थयथायट करू लागले आहेत, हेच यावरून स्पष्ट होते !

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा कृतघ्न असल्याचेच द्योतक ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद ! आता जनतेनेच क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा !

पाकमधील बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा असणारा कायदा अवघ्या २४ घंट्यांत रहित !

इस्लाममध्ये दोषीला थेट ठार मारण्याची कठोर शिक्षा असतांना या शिक्षेला विरोध अनाकलनीय !

लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांची पत्नी एडविना यांच्याशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्यास ब्रिटिश सरकारचा नकार

‘भारताच्या फाळणीशी संबंधित कागदपत्रे भारतात आणून सत्य जनतेपुढे ठेवावे’, असे आजपर्यंतच्या एकाही सरकारला कधी वाटले नाही कि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले नाहीत ! जनतेनेच आता ही कागपत्रे आणण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे !

(म्हणे) पाकचे पंतप्रधान इम्रान खान माझे मोठा भाऊ ! – पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू

अशा राष्ट्राभिमानशून्य व्यक्तींना काँग्रेस पदाधिकारी बनवते, हे लक्षात घ्या !

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑस्ट्रियामध्ये पुन्हा दळणवळण बंदी लागू

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे ऑस्ट्रियाने पूर्ण दळणवळण बंदी लागू करण्यास प्रारंभ केला आहे, तर नेदरलँड्समध्ये आंशिक दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे.

आंतरधर्मीय विवाह नोंदणी करण्यासाठी धर्मांतराला मान्यता मिळण्याची आवश्यकता नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

उत्तरप्रदेशच्या नव्या कायद्यानुसार अवैध धर्मांतर रोखण्यासाठी ६० दिवसांची पूर्वनोटीस देणे आवश्यक आहे. धर्मांतरामागील कारणे शोधण्यासाठी चौकशी झाल्यानंतरच आंतरधर्मीय विवाहांना अनुमती देण्यात येते.

छत्तीसगड येथे १ सहस्र २०० धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्‍यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.