मागील १७ वर्षांत मुंबई महानगरपालिकेतील ५७ लाचखोर कर्मचार्‍यांना कामावरून काढले !

यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झाली आहे.

खरगोन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या २२ जणांनी पुन्हा स्वीकारला हिंदु धर्म !

देशात प्रतिदिन सहस्रो हिंदूंचे धर्मांतर होत असतांना सर्वत्र धर्मांतरविरोधी कायदा न करणे, हे अप्रत्यक्षपणे धर्मांतराला हातभार लावण्यासारखे नव्हे का ? हिंदूंनीही संघटितपणे हा कायदा लवकरात लवकर करण्याची मागणी केली पाहिजे !

ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारलेल्या सरकारी मदरशाच्या मौलानाकडून अवैधरित्या वेतन आणि नंतर निवृत्तीवेतन घेऊन सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

मौलानाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होईपर्यंत सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?

पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षातील १२ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित !

गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

काशी विश्‍वनाथ मार्गाच्या उद्घाटनाला २५ सहस्र साधू, संत, महंत आणि धर्माचार्य यांना आमंत्रित करणार !

संतांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, २०० शहरांचे महापौर आदीही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे.

‘जिओ प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’ दरात १ डिसेंबरपासून वाढ !

‘एअरटेल’ आणि ‘व्होडाफोन-आयडिया’ या आस्थापनांनंतर आता ‘जिओ’ आस्थापनानेही त्याच्या ‘प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’च्या दरात १ डिसेंबरपासून वाढ करण्याची घोषणा केली आहे.

तुर्कस्तानने उत्तर सीरियामध्ये वितरित केलेल्या पुस्तकातील महंमद पैगंबर यांच्या चित्रामुळे संतप्त नागरिकांकडून पुस्तकाची जाळपोळ !

‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

दरभंगा (बिहार) येथील सरकारी आयुर्वेद रुग्णालयामध्ये प्रथमच कुंडली पाहून उपचार करणारा बाह्य रुग्ण विभाग चालू !

भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन अशा पद्धतीने होणे हे अभिनंदनीय आहे ! आता देशातील अन्य रुग्णालयांमध्येही असा विभाग चालू व्हावा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातून जातीवाद संपलेला नाही ! – सर्वोच्च न्यायालय

जे देशात दिसून येते, तेच न्यायालयाने सांगितले आहे. या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !