चीन सीमेवर क्षेपणास्त्रे नेण्यासाठी रस्ते रुंद करणे आवश्यक ! – केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

‘भूस्खलनाच्या धोक्यामुळे धोकादायक प्रदेशात रस्ते ५ मीटरपेक्षा अधिक रुंद असू शकत नाहीत’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिला होता.

पाक नव्हे, तर चीन भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू ! – सी.डी.एस्. बिपीन रावत

‘भविष्यात एकाच वेळी भारताला दोन्ही आघाड्यांवर (पाक आणि चीन) या शत्रूंना तोंड द्यावे लागू शकते, असेही रावत यांनी सांगितले.

बंगालमधील बांगलादेश सीमेवर घुसखोरी करणार्‍या गोतस्करांचा सैनिकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण

भारतीय सैनिकांच्या गोळीबारात २ बांगलादेशी गोतस्कर ठार

भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच उत्तरदायी ! – असदुद्दीन ओवैसी

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी ‘महंमद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते, तर फाळणी झालीच नसती’, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवैसी यांनी वरील विधान केले.

मलेशियामध्ये चिनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनामुळे १ सहस्र ५७३ जणांचा मृत्यू

चीनची प्रत्येक गोष्ट सुमार असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे आता संपूर्ण जगानेच चीनच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार घालणेच योग्य ठरील !

गोंधळलेला पक्षच जात किंवा धर्म यांचे राजकारण करतो ! – काँग्रेस

आप करत आहेत ते गोव्याच्या किंवा एकूणच समाजाच्या दृष्टीने अयोग्यच; पण आपवर टीका करणार्‍या काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सत्ता टिकवण्यासाठी जात आणि धर्म यांचेच राजकारण केले. त्यामुळेच अल्पसंख्यांक डोईजड होऊन बसले. त्याचे काय ?

तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू

पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.

गोव्यातील ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी १५ चित्रपटांची सूची प्रसिद्ध

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी वैशिष्ट्यपूर्ण कथेवर आधारित जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडले जातात. हे चित्रपट पुढे ‘सुवर्ण मयुर’ आणि इतर पुरस्कारांच्या स्पर्धेत समाविष्ट केले जातात.

भाजपने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकींत व्यय केले २५२ कोटी रुपये !

आसाम, बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या ५ राज्यांमध्ये या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने २५२ कोटी रुपये व्यय केले आहेत. त्याने एकट्या बंगालमध्ये अनुमाने १५१ कोटी रुपये व्यय केले आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी, तर फ्रान्समध्ये पाचवी लाट !

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा डोके वर काढू शकतो, हे सध्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपमधील देश अनुभवत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या, तर फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने भीती निर्माण केली आहे.